तेऊरवाडीत गायरान जमिन अतिक्रमण निष्कासितेबाबत शेतकऱ्यांना नोटीसा, शेतकऱ्यांमध्ये खळबळ - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2022

तेऊरवाडीत गायरान जमिन अतिक्रमण निष्कासितेबाबत शेतकऱ्यांना नोटीसा, शेतकऱ्यांमध्ये खळबळ

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
मौजे तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील सर्वे नं.री.स.नं. / गट नं . १०८७ क्षेत्र ४ ९.९ ७ हे हेक्टर पैका अंदाजे २० आर ह्या गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणेबाबत जवळपास १०० हून अधिक शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आज नोटिसा देण्यात 
आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या नोटिशी अन्वये आदेशित करण्यात आले आहे की  तरतुदीनुसार ६ महिने वरील अतिक्रमण निष्कासित करणेचे अधिकार जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना असून सदर गायराणवरील अतिक्रमण निष्कासित करणेसाठी आदेशित केले आहे. 

गायरान जमिनीवर बेकायदेशीर रित्या अतिक्रमण केले आहे असे दिसून आल्यामुळे असे अतिक्रमण आपण स्वखर्चाने सदरची नोटीस मिळाले पासून १० दिवसाचे आत निष्कासित करणे आवश्यक आहे. जर आपणाकडून सदरील गायरान वरील अतिक्रमण वरीलप्रमाणे स्व खर्चाने  निष्कासित करणेत यावे. तसे न 
केलेस शासकीय यंत्रणेद्वारे अतिक्रमण निष्कासित करणेत येईल.  अतिक्रमणास आपण कारणीभूत असलेने शासकीय नियमाप्रमाणे अतिक्रमण निष्कासित करणेसाठीचा सर्व खर्च आपणाकडून जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करणेत येईल. यावर आपले काही म्हणणे असल्यास ते लेखी स्वरुपात सर्व कागदपत्रासह ग्रामपंचायत कालकुंद्री येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. अन्यथा आपले काही म्हणणे नाही असे समजून वरीलप्रमाणे कारवाई करणेत येईल.उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कालमर्यादेत कारवाई करणे बंधनकारक असल्याने आपले म्हणणे मांडण्यासाठी अतिरिक्त मुदत कोणत्याही कारणास्तव देणेत येणार नाही. याची नोंद घेण्यात यावी. असे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पाठविलेल्या नोटीशीत अंदाजे २० आर क्षेत्रावर अतिक्रमण केल्याचा उल्लेख आहे. तसेच ही नोटीस देताना संबधित शेतकऱ्यांचे फोटो सुद्धा काढण्यात आले आहे.
गावात निवडणूकीचे वातावरण तापत असतानाच अतिक्रमण हटविण्या नोटीशी देण्यात आल्याने  एकच खळबळ उडाली आहे. 


No comments:

Post a Comment