किणी येथे संविधान दिनासह संविधान गुणगौरव परिक्षा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2022

किणी येथे संविधान दिनासह संविधान गुणगौरव परिक्षा संपन्नतेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
      किणी (ता. चंदगड) येथे संविधान गुणगौरव समिती व परिवर्तन सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. वैजनाथ उसणकर, एम. व्ही.कांबळे ,  संदीप कांबळे, कॅप्ट.शिवाजी कांबळे, वैशाली गणाचारी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संविधान गुणगौरव परिक्षा घेण्यात आली. या परीक्षेला एकुण ६० परीक्षार्थींनी सहभाग नोंदविला. किणी आणि माणगाव केंद्रावर परिक्षा घेण्यात आल्या. केंद्रप्रमूख/समन्वयक म्हणून संदीप गणाचारी यांनी काम पाहिले. जयप्रकाश विद्यालयाचे यावेळी विशेष सहकार्य मिळाले. सहभागी सर्व परिक्षार्थींना संविधान प्रमाणपत्र देण्यात आले.


No comments:

Post a Comment