विभागीय क्रिकेट स्पर्धेत मालवण शासकीय तंत्रनिकेतनचा संघ विजयी,विभागीय स्पर्धेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2022

विभागीय क्रिकेट स्पर्धेत मालवण शासकीय तंत्रनिकेतनचा संघ विजयी,विभागीय स्पर्धेसाठी निवड

 


मालवण / सी. एल. वृत्तसेवा 

             अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोषात पाॅलटेक्निक येथे संपन्न झालेल्या आंतर अभियांत्रिकी पदविका विभागीय विद्यार्थी क्रिडा स्पर्धा बी-1, झोन,कोल्हापूर अंतर्गत “लेदर बाॅल क्रिकेट” स्पर्धेत मालवण (जि. सिंधुदूर्ग) येथील शासकीय तंत्रनिकेतन च्या  संघाने विजेतेपद पटकाविले. उपांत्य फेरीत संजय घोडावत पॉलिटेक्निक तर अंतिम सामन्यात महागाव पॉलिटेक्निक संघाचा पराभव केला. प्रत्येक सामन्यात अवघ्या १० षटकांमध्ये १०० पेक्षा जास्त धावा जमवण्याचा पराक्रम मालवण पॉलिटेक्निकच्या फलंदाजांनी केला. 

       आता पुणे येथे ८ व ९ डिसेंबर  रोजी होणाऱ्या आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी हा संघ सहभागी होईल.  सदर संघासोबत संघव्यवस्थापक म्हणून प्रशांत आखूड व किशोर कांबळे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या नियोजनासाठी प्रा. बडेकर व प्रा. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व स्पर्धकांचे शासकीय तंत्रानिकेतन, मालवणचे प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, जिमखाना उपाध्यक्ष प्रा. डी. एन. गोलतकर व संस्थेचे क्रीडा अधिकारी प्रा. पी. एस. थोरात  यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment