आसगाव येथील गावठाणातील भूखंडाचे कब्जे देण्याची नागरिकांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

28 November 2022

आसगाव येथील गावठाणातील भूखंडाचे कब्जे देण्याची नागरिकांची मागणी

 

संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        आसगाव (ता. चंदगड) येथील गट नंबर ७५६ मध्ये पाडण्यात आलेल्या भूखंडाबाबत, कायदेशीर सोपस्कार पूर्ण होऊनही या भूखंड धारकांना अद्याप कब्जे मिळालेले नाहीत. तहसिलदार  यांनी  या प्रकरणी लक्ष घालून भूंखडाचे कब्जे नागरिकांना द्यावेत अशी मागणी होत आहे. 


      १९८५ साली गट नबंर ७५६ मधील जमिनीत एक हेक्टर ५६ गूठ्यांत नागरिकांनी मागणी केल्यामूळे वाढीव गावठाण मंजूर करून ८७ भूखंड पाडणेत आले आहेत. यापैकी ५४ नागरिकांनी कब्जे हक्काची रक्कम शासनाकडे भरली असून या ५४ गरजू नागरिकांना  या भूंखडाचे वाटपही करण्यात आले आहे. तथापि या भूंखडाचा कब्जा न दिल्याने याची नोंद ७/१२ पत्रकी होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शासनाने वस्तुस्थिती पाहून या भूखंडाची कब्जे पट्टी संबंधित नागरिकांना द्यावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment