डुक्करवाडीचे प्रभाकर कांबळे प्रबोधनकार ठाकरे उत्कृष्ट पत्रकारिता गौरव पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2022

डुक्करवाडीचे प्रभाकर कांबळे प्रबोधनकार ठाकरे उत्कृष्ट पत्रकारिता गौरव पुरस्काराने सन्मानित

पुरस्कार स्विकारताना प्रभाकर कांबळे 

मुंबई / वृत्तसेवा

          साप्ताहिक भगवे वादळ यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त धारावी येथे गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे (विक्रोळी मुंबई) यांना प्रबोधनकार ठाकरे उत्कृष्ट पत्रकारिता गौरव पुरस्कार "दैनिक मुंबई मित्र चे समूह संपादक व कामगार नेते अभिजित राणे मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर, ज्येष्ठ पत्रकार दादासाहेब शिंदे, साहित्यिक डॉ. अ. ना. रसनकुटे,  दैनिक मुंबई चौफेरचे संपादक प्रफुल्ल फडके, माजी आमदार बाबुराव माने आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला.

                                                जाहिरात

जाहिरात

          वनिता फाउंडेशनचे संस्थापक व राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हाध्यक्ष तसेच मिलिंद सेवा सहकारी संस्था मर्यादित मुंबईचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार/समाजसेवक, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील डुक्करवाडी गावचे सुपुत्र प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी वयाच्या १६ व्या वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा, सहकार व पत्रकारिता क्षेत्रात महाराष्ट्राच्या जडणघडणीत उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविला आहे. ल्याबद्दल त्यांना विविध संस्था संघटना तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार पुरस्कार बरोबर २०० हून अधिक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्यस्तरीय  पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment