चंदगडकरांनी लुटला खग्रास चंद्रग्रहणाचा आनंद - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2022

चंदगडकरांनी लुटला खग्रास चंद्रग्रहणाचा आनंद

 

कागणी : ग्रहणादरम्यान सायंकाळी चंद्राची दिसलेली छबी.
 (छायाचित्र सेवा : प्रसाद सावंत, महिपाळगड)

 कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

      मंगळवार दि. 8 रोजी चंदगड तालुक्यातील अनेक खगोलशास्त्राच्या विद्यार्थ्यासह अनेक नागरिक, शिक्षकानी खग्रास चंद्रग्रहणाचा आनंद लुटला. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता सुरू झालेले खग्रास चंद्रग्रहण 6:45 पर्यंत सुरू होते. मात्र 6 वाजून 15 मिनिटांनी पूर्णपणे चंद्राची छबी दिसल्याचे अभ्यासक व बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतनचे शिक्षक प्रसाद सावंत यांनी चंदगड लाईव्हला सांगितले.   

           भारतात कोठेही ग्रहण स्पर्श दिसणार नाही महाराष्ट्र आणि इतर प्रदेशात हे ग्रहण खंडग्रास म्हणूनच सर्वांनी अनुभव घेतल्याचे त्यांनी सांगितले.  ग्रहणादरम्यान कोणतेही परिणाम होत नाहीत मात्र पारंपारिक संस्कृतीनुसार काही जणांनी सूर्यास्त ग्रहण संपल्यानंतर स्नान केल्याचा अनुभव एकमेकांना नागरिक सांगत होते. ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही, मात्र शेकडो वर्षांच्या गैरसमजुतीमुळे अनेक प्रकार केले जात असल्याचेही अभ्यासकाने सांगितले. No comments:

Post a Comment