चंदगड तालुका मराठा सेवा संघाची नवी कार्यकारणी जाहीर ! 'सारथी' संस्थेबाबत मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2022

चंदगड तालुका मराठा सेवा संघाची नवी कार्यकारणी जाहीर ! 'सारथी' संस्थेबाबत मार्गदर्शन

 

अडकूर येथील मराठा सेवा संघाच्या नव्या कार्यकारणीची निवड पत्रे प्रदान करताना जिल्हाध्यक्ष महिपती बाबर व मान्यवर.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
 महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाज बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासात 'सारथी' संस्था मैलाचा दगड ठरेल. असे प्रतिपादन सारथी संस्थेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी स्वरूप यादव यांनी केले. ते मराठा सेवा संघाच्या अडकूर ता. चंदगड येथील सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर होते.
    स्वागत जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कुट्रे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा प्रवक्ते शहाजी देसाई यांनी केले. यावेळी पुढे बोलताना स्वरूप यादव यांनी 'सारथी' मार्फत मराठा तरुणांना एमपीएससी, यूपीएससी, बुद्धभूषण छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती, एनएमएमएस परीक्षा, सारथी मार्फत प्रकाशित साहित्य, विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षा, भविष्यकालीन योजना यांच्या याबाबत तपशीलवार माहिती दिली. मराठा तरुण तरुणींनी सारथीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांनी मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मराठा सेवा संघ अखंडपणे प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विनायक पाटील, बेळगाव जिल्हाध्यक्ष किरण धामणेकर, मराठा मंडळ मीरा-भाईंदर चे अध्यक्ष सुरेश दळवी, माजी सभापती बबन देसाई आदींची भाषणे झाली. अर्जुन पाटील यांनी कुरुंदवाड येथील पाच जिल्ह्यांच्या विभागीय अधिवेशनाचा अहवाल वाचून दाखवला.
 यावेळी मराठा सेवा संघाची चंदगड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष संदीप राजाराम देसाई, उपाध्यक्ष कमलाकर तुकाराम मंडलिक, सचिव विजय भैरू अर्दाळकर, उपाध्यक्ष नंदकुमार पाटील, तालुका संघटक शंकर दत्तू कोले व कौशल काशिनाथ बांदिवडेकर यांना जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांच्या हस्ते निवड पत्रे प्रदान करण्यात आली.
सभेस अडकूरच्या सरपंच यशोदा कांबळे, शिक्षक परिषद जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, माधुरी कुट्रे, विष्णू कंग्राळकर, अरुण कुट्रे, किशोर धुरी, प्रतिक इंगवले, संजय देसाई, अभिजीत मंडलीक आदींसह चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुका व बेळगाव जिल्ह्यातील मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश इंगवले यांनी आभार मानले.
No comments:

Post a Comment