कोवाड महाविद्यालयात विद्यार्थ्यी प्रवेश दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2022

कोवाड महाविद्यालयात विद्यार्थ्यी प्रवेश दिन साजरा

कोवाड महाविद्यालयात विद्यार्थ्यी प्रवेश दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

      कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि  विज्ञान महाविद्यालयात ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी प्रवेश दिवस म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. एस. पवार होत्या.

      प्रारंभी डॉ. एम. एस. पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले. प्रा. डॉ. आर. डी. कांबळे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेताना म्हणाले, ''विश्वरत्न,भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय जीवनास सुरु  झालेला  प्रवेश दिवस आहे. सात नोव्हे या दिवशी बाबासाहेब यांचा सातारा येथील आताच  प्रतापशिंह हायस्कुल म्हणजेच तत्कालीन गव्हर्मेंट इंग्लिश  मीडियम  हायस्कुल मध्ये सात नोव्हे. १९००  रोजी शाळेत प्रवेश घेतला होता ते सन  १९०४ वर्षापर्यंत ते ४ थी  पर्यंत ते या शाळेत होते.

         सदर दिवस विध्यार्थी दिवस म्हणून संपूर्ण देश भर साजरा करत असतो. ही बाब युवा पिढीला तसेंच  आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. अध्यक्षीय भाषणात डॉ. एम. एस. पवार म्हणाल्या, ``आज या भूमीवर एक देशाचे भारतरत्न म्हणून बाबासाहेबांना स्थान अढळ आहे ते केवळ त्यांच्या संपूर्ण समाजिक योगदानामुळे या देशाला जागतिक कीर्तीवर पोहचवले. म्हणून या  दिवसाला जागतिक स्तरावर महत्व आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे  वैश्विक दैवत आहे त्याचं कार्य ऊर्जा देणार आहे.

                                                जाहिरात

जाहिरात

        यावेळी प्रास्ताविक डॉ. व्ही. के. दळवी यांनी केले. आभार  प्रा. शीतल मंडले आणि सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे यांनी केले. यावेळी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक सेवक कर्मचारी आणि विध्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम सांस्कृतिक विभागाने आयोजित केला होता.

No comments:

Post a Comment