मतदार पुनर्निरीक्षण संदर्भात गुरूवारी होणाऱ्या ग्रामसभेत नागरिकांनी सहभागी व्हावे - तहसीलदार रणवरे - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2022

मतदार पुनर्निरीक्षण संदर्भात गुरूवारी होणाऱ्या ग्रामसभेत नागरिकांनी सहभागी व्हावे - तहसीलदार रणवरे



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

             निवडणुक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरूस्ती करून ती त्रुटी मतदार यादी होण्याच्या अनुषंगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या निमित्त चंदगड तालुक्यातील  १०९ ग्रामपंचायती मध्ये गुरूवार दि. १० नोव्हेंबर २०२२ रोजी होणा - या विशेष ग्राम सभा यामध्ये अधिकाधिक नागरीकांनी सहभाग व्हावे व मतदार नाव नोंदणी करावे असे आवाहन तहसीलदार तथा चंदगड विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी विनोद रणवरे यांनी केले आहे.

                                                                               जाहिरात

जाहिरात

     निवडणुक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरूस्ती करून ती त्रुटी मतदार यादी होण्याच्या अनुषंगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. २७१ चंदगड विधानसभा मतदारसंघांतर्गत चंदगड तालुकेतील सध्यस्थिती असलेल्या एकूण १ ९ ८ मतदान केंद्रावरही विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम माहे ०१ जानेवारी , ०१ एप्रिल, ०१ जुलै व ०१ ऑक्टोंबर, २०२२ या महिन्यात आयोजित केलेला होता. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार यांची नांव नोंदणी, दुरुस्ती व मयत / दुबार / स्थालांतर मतदारांची वगळणी केलेली आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO ) हे प्रत्येक घरात भेट देऊन मतदान ओळखपत्र आधार कार्ड ला कसे जोडावे याबाबत प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार यांची नांव नोंदणी, दुरुस्ती तसेच मयत / दुबार / स्थालांतर मतदारांची वगळणी केलेली आहे अगर कसे याची पडताळणी करणे तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये अद्याप नाव नोंद न केलेले नवमतदार, दुरुस्ती व नाव कमी करणे याबाबत चंदगड तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीमध्ये दि. १० / ११ / २०२२ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केलेले आहे. यावेळी प्रारूप मतदार यादी ग्रामपंचायत चावडीवर पाहण्यासाठी / तपासण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरीकांना हरकती असल्यास त्यांना नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास त्यांना विहीत अर्जाचे नमुने तेथेच ग्रामसभेत उपलब्ध करून BLO मदत करणार आहेत. सदर कार्यक्रमांतर्गत २७१ चंदगड विधानसभा मतदारसंघांतर्गत चंदगड तालुकेतील ठिकाणात बदल असलेले ५ (मतदान केंद्र क्र २६०,२६१,२६२- कोवाड, २७२- चन्नेहट्टी यर्तनहट्टी व ३५६- बुक्कीहाळ) व नावात बदल असलेले ४ (मतदान केंद्र क्र १ ९९- अमरोळी, २४३- लाकुरवाडी, ३३ ९- जंगमहट्टी व ३६५ - शिनोळी बुद्रुक) असे एकूण ९ मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण प्रस्ताव पाठविण्यात आले होते. भारत निवडणूक आयोग यांनी सदर मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण प्रस्तावाना मान्यता दिलेली आहे. गुरूवार दि. १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विशेष ग्राम सभा यामध्ये अधिकाधिक नागरीक सहभाग व्हावे व मतदार नाव नोंदणी करावे असे आवाहन तहसीलदार श्री. रणवरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment