जीवनात नेहमी आनंदी राहा ताण कमी होईल- डॉ.भादवणकर - चंदगड लाईव्ह न्युज

05 November 2022

जीवनात नेहमी आनंदी राहा ताण कमी होईल- डॉ.भादवणकरचंदगड / प्रतिनिधी
      हलकर्णी (ता. चंदगड) यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे स्ट्रेस मॅनेजमेंट सर्टिफिकेट कोर्स चे उद्घाटन मानसशास्त्र विभाग व कॉमर्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले.                      कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. के. एम. गोनुगडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. पी .एल .भादवणकर उपस्थित होते यावेळी त्यांनी जीवनात नेहमी आनंदी राहा ताण कमी होईल आपल्या दररोजच्या जीवनात वेगवेगळे प्रसंग येत असतात त्यानुसार प्रत्येकाला ताण येत असतो सततच्या ताण-तणावामुळे शारीरिक व मानसिक आजार उद्भवतात ताण कमी करण्यासाठी नेहमी आवडीनिवडी जपा वेळेचे, प्रसंगाचे व्यवस्थापन करायला शिका नेहमी सकारात्मक विचार मनात आना त्याचबरोबर सामाजिक आधार शोधा असे सांगितले.  
     कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी जीवनात ताण कमी करा पुरेसा व्यायाम व विश्रांती घ्या असे सांगितले.यावेळी प्राचार्य डॉ.बी .डी .अजळकर नॅक सह समन्वयक डॉ. जे जे व्हटकर प्रा. जी पी कांबळे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. जी जे गावडे यांनी केले.


No comments:

Post a Comment