अडकुर येथे बुधवारी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग - चंदगड लाईव्ह न्युज

05 November 2022

अडकुर येथे बुधवारी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योगचंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       अडकूर (ता. चंदगड) येथील कलनाथ मंदिरात कार्तिक स्वामी उत्सव समिती व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने बुधवार दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे ४.५१ वा ते रात्री १० वाजेपर्यंत कार्तिक स्वामींचा दर्शन योग आहे. यानिमित्त भाविकांना कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

        गेली वीस वर्ष कृतिका नक्षत्रावर कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याचा पूर्वापार परंपरा आहे. भगवान शंकर आणि पार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव कार्तिक स्वामी आहेत कार्तिक महिन्यात कृतिका नक्षत्रावर भगवान कार्तिक स्वामींचे दर्शन सहकुटुंब व सह परिवार घ्यावे वर्षातून एकच वेळा स्त्रियांना कार्तिक स्वामी दर्शन घेता येते. त्या दिवशी कार्तिक स्वामींची विधि व पूजा केल्याने वेड्यासारखी संपत्ती मिळते, याचे दर्शन घेण्याचा पूर्वापार प्रथा आहे शुभ कामाला जातो .कृतीका नक्षत्रावर त्याचे दर्शन घेणे धनसंपत्ती कारक मानले गेलेले आहे कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आर्थिक अडचणीत कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या परवणी काळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाची जाते असा समज आहे, तर हा अनुभव नक्की येतो. 

          विशेष म्हणजे स्त्रियांना कार्तिकेयांचे दर्शन वर्षभर वर्ज्य असते, परंतु या काळात स्त्रीया कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात. स्वामींच्या दर्शनाच्या वेळी  मोरपीस कमळाचे फूल किंवा आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या पाकिटात वर्षभर सांभाळून ठेवावे अशी देखील परंपरा आहे. दर्शनाच्या वेळी कार्तिक स्वामींच्या २८ नावांचा उल्लेख केलेले प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठण केल्यास अधिक लाभदायी ठरते. या सोहळ्याचा लाभ भाविकांंनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी प्रसादाची सोय केलेली आहे.

No comments:

Post a Comment