हलकर्णी महाविद्यालयात हिमोग्लोबीन तपासणी शिबीर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

05 November 2022

हलकर्णी महाविद्यालयात हिमोग्लोबीन तपासणी शिबीर संपन्न

हलकर्णी महाविद्यालयात हिमोग्लोबीन तपासणी शिबीरात सहभागी विद्यार्थ्यी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबीर संपन्न झाले. शिबीरामध्ये १५० विद्यार्थिनी व ११ शिक्षकांनी हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. 

       प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शुभांगी पाटील यांनी हिमोग्लोबीन पातळी कमी झाल्याने होणारे आजार, समतोल आहार व सकस आहार या संबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील होते. ते म्हणाले, “सदृढ शरीरात सदृढ मन निवास करीत असते. विद्यार्थिनींने स्वताःच्या आरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे". या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर उपस्थित होते. आरोग्य केंद्र कर्मचारी सतिश झाजरी, शालन वर्षे व साधना पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ. व्हटकर जे. जे., ग्रंथपाल वंदना केळकर यांनी नियोजन केले. सौ. हर्षदा सावरे, माया पाटील, माधुरी पाटील यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment