हलकर्णी महाविद्यालयात दौलत भितीपत्रकाचे अनावरण - चंदगड लाईव्ह न्युज

05 November 2022

हलकर्णी महाविद्यालयात दौलत भितीपत्रकाचे अनावरण चंदगड /प्रतिनिधी 
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व भीतीपत्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने दौलत भितीपत्रकाचे अनावरण संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या भितीपत्रकामध्ये पर्यावरण जागरूकता हा विषय घेऊन भितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर होते.                  प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. ए. एस. बागवान यांनी केले. यावेळी त्यांनी भितीपत्रका मागची भूमिका व पर्यावरण संतुलन जनजागृती करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी सर्व प्राध्यापक, भिती पत्रक विभागाचे सर्व सदस्य उपस्थित होते. स्वागत प्रा. साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. जी. पी. पाटील यांनी केले.


No comments:

Post a Comment