अतिक्रमण मोहीम अडथळा, कोवाडला कडकडीत बंद - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2022

अतिक्रमण मोहीम अडथळा, कोवाडला कडकडीत बंद

कोवाड बाजारपेठेत जमलेले नागरीक.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा करून मारहाणीच्या निषेधार्थ पाळण्यात आलेल्या कोवाड बंदला १०० टक्के प्रतिसाद लाभला.बाजारपेठेतील सर्व दुकाने व व्यवहार बंद होते.
         कोवाड बाजारपेठेतील रस्त्यावर आलेला घराचा अतिक्रमित  लोखंडी जिना काढण्यासाठी कोवाड ग्रामपंचायत सरपंच व सदस्य रविवार दि. ३०/१०/२०२२ रोजी गेले होते. यावेळी सरपंच अनिता भोगण यांना शिवीगाळ व उपसरपंच पुंडलिक जाधव यांना मारहाण तसेच ग्रामपंचायत सदस्यांवर फिर्याद दाखल झाली होती. या निषेधार्थ ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आज बुधवारी बंदचा इशारा दिला होता.
         रविवारी घटनेवेळी झालेल्या हाणामारी बद्दल परस्परविरोधी फिर्यादीही दाखल झाल्या आहेत. चंदगड पोलीसांकडून याबाबत अधिक तपास सुरू असून आज बंद वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोवाड पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



No comments:

Post a Comment