मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडची अडकूर येथे ६ रोजी बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2022

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडची अडकूर येथे ६ रोजी बैठक


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

           कोल्हापूर जिल्हा मराठा सेवा संघ संघाच्या संभाजी ब्रिगेड व अन्य ३२ कक्षांची बैठक अडकूर (ता. चंदगड) येथे ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता बोलवण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा प्रवक्ते शहाजी देसाई (कडगाव, भुदरगड) यांनी दिली. अडकूर येथील रवळनाथ मंदिर नजीक हॉल मध्ये होणाऱ्या बैठकीत मराठा आरक्षण सद्यःस्थिती, विविध क्षेत्रातील मराठा तरुणांसाठी उपलब्ध नोकरीच्या संधी, सारथी योजनेतील लाभ, याबरोबरच मराठा तरुण-तरुणी व समाज बांधवांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती व तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. बैठकीसाठी चंदगड, आजरा गडहिंग्लज तालुक्यातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात आले असून यावेळी चंदगड तालुका व परिसरातील मराठा बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कुट्रे, चंदगड तालुकाध्यक्ष प्रकाश इंगवले आदींनी केले आहे. 

No comments:

Post a Comment