नेसरी जवळील अपघातात कागल येथील एकजण ठार - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2022

नेसरी जवळील अपघातात कागल येथील एकजण ठारतेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
 गडहिंग्लज - चंदगड  राज्य महामार्ग क्र. I79 वर नेसरी पासून एक किलोमीटर अंतरावर पंडीत पाटील यांच्या शेताजवळील वळण नजिक झालेल्या मोटरसायकल अपघात कागल येथील मोटार सायकलस्वार जागीच ठार झाला. बुधवार (ता. २) रोजी सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मिलिंद अशोक हिंगे  (वय. ४५  रा. कुंभार गल्ली निपाणी वेस कागल ता. कागल) असे मृताचे नाव आहे. 
नेसरी : अपघाताची पहाणी करताना नेसरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी.


     अपघाताची फिर्याद उत्तम नारायण फगरे (वय. ५२, रा. सावतवाडी तर्फ नेसरी, ता. गडहिग्लज)  यांनी नेसरी पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादीवरून  पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.  हिंगे हे ट्रॅक्टर दुरूस्तीचा व्यवसाय करत होते. ते मोटरसायकल नंबर एमएच १० एएक्स ७४४४ वरून कामानिमित्त कागलहून गडहिंग्लज मार्गे सावतवाडीकडे  येत असताना वळणाचा अंदाज न आलेने किंवा मोटरसायकलचा वेग न आवरलेने ते रोडचे बाजुस चरीत असले झाडास धडकून गंभीर जखमी होवून जागीच मृत्यु झाला. अपघातात मोटरसायकलचे मोठे  नुकसान झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,  दोन मुलगे, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.  अपघातस्थळी नेसरी परिसरातील नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शोभा भोसले करत आहेत.
No comments:

Post a Comment