दौलतमध्ये गुंतवलेले पैसे परत द्या,कारखाना कुणीही चालवा.अथर्व चे खोराटे यांची भुमिका, गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2022

दौलतमध्ये गुंतवलेले पैसे परत द्या,कारखाना कुणीही चालवा.अथर्व चे खोराटे यांची भुमिका, गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचंदगड / सी. एल. वृत्तसेवा
निलंबित ६९ कामगारांना घेवून कारखाना सुरू करू शकत नाही. कारखान्यात गुंतवलेले पैसे आज कुणीही परत करावेत आणि कारखाना चालवावा अशी भूमिका अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी घेतली. त्यामुळे कामगारांच्या बोनसवरून सुरू झालेला वाद मिटवण्यासाठी बोलवली बैठकच गुंडाळली गेली. 
    अचानकपणे आलेल्या या प्रसंगाने सर्वच प्रतिनिधी, शेतकरी, कामगार यांच्यासमोर या वर्षीचा हंगाम सुरू होणार की नाही अशा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर  सर्वांनी कारखाना स्थळावर आयोजित मेळाव्यात आपापली भूमिका मांडली. दरम्यान गुरुवार दि. ३ नोव्हेंबर रोजी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर अथर्व कंपनीविरोधात दौलत बचाव संघर्ष समिती या बॅनरखाली मोर्चा काढण्याचे ठरले.

 गेल्या दीड - दोन महिन्यांपासून कामगार आणि अथर्व कंपनी व्यवस्थापन यांच्यामधील वादाचा तिढा अखेरच्या क्षणापर्यंत सुटला नाही . दगडफेक आणि हाणामारी करणाऱ्या ६ ९ कामगारांना कमी केल्यानंतरच कारखाना सुरू करणार असल्याची ठाम भूमिका ' अथर्व'चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी घेतली . त्यामुळे यावर्षीच्या गळीत हंगामावर चिंतेचे सावट पसरले . चर्चेदरम्यान काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण होते . कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या महिन्यात ३५ दिवस काम बंद आंदोलन केले होते . जिल्हाधिकारी यांनी हा प्रश्न सोडवला होता . मात्र , काही दिवसांतच दिवाळीच्या बोनस , शिफ्ट चार्जवरून कारखान्याचे गेट तोडून कामगारांनी प्रवेश केला व संतप्त कामगारांनी दगडफेक केली . गळीत हंगामाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या प्रकारानंतर गाळप बंद करण्यात आले होते . दरम्यान कारखाना व्यवस्थापन , कामगार , सभासद आणि सर्व पक्षीय बैठक मंगळवारी कारखानाकार्यस्थळावर झाली. 
    यावेळी गोपाळराव पाटील,अशोक जाधव,मल्लिकार्जुन मुगेरी , विजय देवणे , भरमाना गावडे , नितीन पाटील , तानाजी गडकरी , विष्णू गावडे आदींनी आपली मते मांडली . मते मांडलेल्या सर्वांची भूमिका ' दौलत ' सुरू झाली पाहिजे , अशीच होती . सभेला संग्राम कुपेकर उपस्थित होते . मात्र , शेवटपर्यंत एकही शब्द बोलले नाहीत . कामगारांना सुपारी दिल्याचा आरोप कामगारांची डोकी भडकवण्यासाठी कोणीतरी सुपारी दिली असावी , असा आरोप मानसिंग खोराटे यांनी केला . यावर सुभाष देसाई - यांनी आरोप खोडून काढत कामगारांची बाजू मांडली .कामगार संघटना अध्यक्ष प्रदीप पवार यांनीही झाल्या प्रकाराची माफी मागून कारखाना सुरू करावा , अशी विनंती खोराटे यांच्याकडे केली . मात्र , ६ ९ कामगारांचा प्रश्न कोर्टात आहे . त्यांचा पगारही आम्ही देतो . कोर्ट निर्णय झाल्यानंतरच त्यांना कामावर घेणार असल्याची भूमिका खोराटे यांनी घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी सभा घेण्यात आली. संजय पाटील, 
 पांडूरंग बेनके, जानबा चौगुले, भिकू गावडे, तुकाराम बेनके, उदयकूमार देशपांडे, शंकर ओऊळकर, कृष्णा पाटील, अनिल सुरूतकर, ॲड संतोष मळवीकर यांच्यासह शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment