भ्रष्ट शिक्षणाधिकारी किरण लोहार ची नार्को टेस्ट करा -- माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2022

भ्रष्ट शिक्षणाधिकारी किरण लोहार ची नार्को टेस्ट करा -- माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांची मागणीचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

 सोलापूर जि. प. चे प्राथमिक  शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचेवर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. लोहार हे कोल्हापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असताना एकूणच त्यांचा सर्व कारभार हा वादग्रस्तच राहिला होता. त्यामुळं लोहार यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील यांनी केलीय. 

     ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले प्रकरणी चर्चेत असलेले सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचेवर सोलापूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलीय. लोहार हे काही वर्ष कोल्हापूर जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून देखील कार्यरत होते. यावेळचा देखील त्यांचा कारभार वादग्रस्तच राहिला होता. त्यामुळं आता, माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील यांनी देखील लोहार यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत आपण राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करणार असून लाच लुचपतप्रतिबंधक विभागाकडे देखील तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.No comments:

Post a Comment