कोवाड महाविद्यालयात मूल्यशिक्षण विभागाच्या वतीने "व्यक्तिमत्व विकासासाठी प्राणायाम "या विषयावर व्याख्यान संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

06 November 2022

कोवाड महाविद्यालयात मूल्यशिक्षण विभागाच्या वतीने "व्यक्तिमत्व विकासासाठी प्राणायाम "या विषयावर व्याख्यान संपन्नचंदगड /प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात योग आणि मूल्यशिक्षण  विभागाच्या वतीने व्यक्तिमत्व विकासासाठी प्राणायाम या विषयावर  व्याख्यानाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. डी. कांबळे होते. प्रारंभी प्रास्तविकात डॉ. ए. एस. आरबोळे यांनी विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.
                 
                     जाहिरात
जाहिरात

प्रमुख वक्ते इंग्लिश विभागाचे प्रा. डॉ. मोहन घोळसे  होते ते आपल्या मार्गदर्शनात् म्हणाले, आजच्या पिढीने  नव्या  उमेदीने प्रत्येक क्षेत्रात जाताना खूप मेहनत, कष्ट करण्याची गरज  आहे. कोणतेही कार्य पूर्ण करताना मेहनत महत्वाची असते. आजचा काळ भयावह आहे स्पर्धा पावलोपावली  आहे. त्यात वावरत असताना आपले व्यक्तिमत्व  व्यक्त करण्यासाठी वीर. महात्मे, विचारवंताच्या विचारांना स्वीकारून आपले बनवू शकतो.  आपला, समाज आणि  शिक्षण व्यवस्था आपल्याला खूप  शिकवत  असते. यासाठी आपण सर्व स्तरातील   ज्ञान प्राप्त केले पाहिजे, तरच आपण सुज्ञ होऊ आणि व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अनेक बाबी आवश्यक असतात. त्याचे निरीक्षण करून अभ्यास करून आपले व्यक्तिमत्व घडवता येते. त्यासाठी परिश्रमा ची नितांत गरज असावी, म्हणून मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. आर. डी. कांबळे म्हणाले, "आजची पिढी वेगवेगळया बाह्य गोष्टीच्या वेडान  आपल जीवन खराब करताना दिसतेय , फिल्मी दुनियेतील मायावी  आकर्षणाकडे आणि चंगळवादाकडे आकर्षित होताना दिसते. आजचा युवक वर्ग  भरकटतना दिसतोय त्याने वेळीच स्वतःला सावरणे ही काळाची गरज असल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले.
स्वागत विभागाचे प्रमुख डॉ.बी.एस.पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन शिवानी पाटील व आर्या किणी
यांनी केले.
 यावेळी डॉ. के. एस. काळे. डॉ.व्ही.के.दळवी.डॉ.दीपक पाटील,  डॉ.एस.बी.पाटील. डॉ. के.पी वाघमारे डॉ. एस.एन गावंडे.प्रा.शीतल मंडले. प्रा.प्रियंका कांबळे  डॉ.सुनीता कांबळे प्रा.संदीप मुंगारे आदी सर्व विद्याशाखांचे प्रमुख, प्राद्यापक शिक्षकेतर सेवक कर्मचारी व विध्यार्थ्यी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य .डॉ.एम.एस.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख.डॉ.बी.एस.पाटील यांनी केले होते.


No comments:

Post a Comment