कोवाड महाविद्यालयात विनायक महागांवकर याचा सत्कार, कस्टम ऑफिसर कस्टम अँड सेंट्रल एक्साईज परीक्षेत मिळवले यश - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2022

कोवाड महाविद्यालयात विनायक महागांवकर याचा सत्कार, कस्टम ऑफिसर कस्टम अँड सेंट्रल एक्साईज परीक्षेत मिळवले यश

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       कोवाड (ता. चंदगड) येथील कला,वाणिज्य् आणि विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. एन. पी. महागांवकर यांचे चिरंजीव विनायक महागांवकर याने कस्टम ऑफिसर कस्टम अँड सेंट्रल एक्साईज ची परीक्षेत उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल महाबिद्यालयाच्या वतीने  प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.                    प्रास्ताविक प्रा. डॉ दीपक  पाटील  यांनी करून विनायकच्या शालेय जीवनातील अभ्यास पद्दतीचा आढावा घेतला. सत्काराला उत्तर देताना विनायक म्हणाला, माझ्या  यशात माझे आई-वडील गुरुजन यांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामीण मुलांच्याकडे जिद्द असेल तर कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकतो. त्यासाठी कठोर मेहनत करावी लागते. 

                                                 जाहिरात

जाहिरात

      यावेळी डॉ. बी. एस. पाटील, डॉ.आरबोळे, डॉ. ए. के. कांबळे, डॉ. दीपक पाटील, डॉ. व्ही. के. दळवी, मारुती बिर्जे, प्रा. अशोक पाटील, संजय कुट्रे आदी उपस्थित होते. आभार डॉ. आर. डी. कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment