हलकर्णी येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. ब्लॅक पैंथर पक्षाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2022

हलकर्णी येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. ब्लॅक पैंथर पक्षाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन

नायब तहसीलदार हेमंत कामत यांना निवेदन देताना ब्लॅक पैंथर पक्षाचे पदाधिकारी


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       मौजे हलकर्णी (ता. चंदगड) येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. अन्यथा ब्लॅक पैंथर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार हेमंत कामत व पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांना देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, विष्णू कांबळे, राजु कांबळे, सुधाकर कांबळे, वैजनाथ कांबळे, दिपक माळी, पंडीत कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व हलकर्णीचे गावचे नागरिक व महिला उपस्थित होत्या.
No comments:

Post a Comment