यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात टॅली अकाउंटिंग सर्टिफिकेट कोर्सचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2022

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात टॅली अकाउंटिंग सर्टिफिकेट कोर्सचे उद्घाटन

             


 
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           यशवंतराव महाविद्यालय व अकाउंटिंग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने टॅली अकाउंटिंग सर्टिफिकेट कोर्स चे उद्घाटन वेद इन्स्टिट्यूट, हलकर्णीचे संचालक अजित कडुकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर होते.

         यावेळी अजित कडूकर यांनी भविष्यात टॅली कोर्स मुळे होणारे फायदे काय आहेत. या आधुनिक युगामध्ये टॅली कोर्स ला किती महत्त्व आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी आजचे युग हे कम्प्युटरचे युग आहे आणि यात आपण साक्षर झाले पाहिजेत असे मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. जी. जे. गावडे यांनी केले.  स्वागत प्रा. जी. पी. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन कुमारी माधुरी सुतार यांनी तर आभार प्रा. सौ. एम. एन. पाटील यानी मानले. यावेळी बी. कॉम. भाग दोनचे या कोर्सला प्रवेश घेतलेले विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment