ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता ऑफलाईन अर्ज भरता येणार, निवडणुक आयोगाचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2022

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता ऑफलाईन अर्ज भरता येणार, निवडणुक आयोगाचा निर्णय

 


चंदगड/प्रतिनिधी
ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज सादर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहितीही आयोगाचे आयुक्त यू . पी . एस . मदान यांनी दिली आहे . मदान म्हणाले , राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर रोजी राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती . त्यानुसार २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या . आता त्यामध्ये अंशत : दुरूस्ती करून उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत सादर करता येतील. 


No comments:

Post a Comment