शालेय विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा! सोन्याची रिंग केली परत - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2022

शालेय विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा! सोन्याची रिंग केली परत

साद मुल्ला याचे अभिनंदन करताना केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, वर्गशिक्षिका मधुमती गावस, शाहीन मुल्ला, शिक्षक व विद्यार्थी 

कोवाड: सी. एल. वृत्तसेवा

          केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थीनी जोया अझरुद्दीन मुल्ला हिच्या कानातील सोन्याची रिंग खेळताना हरवली होती. ती इयत्ता चौथीतील विद्यार्थी साद बाबासाहेब मुल्ला याला क्रीडांगणावर सापडली. ७ हजार रुपये किंमतीची रिंग त्याने प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्याला जोयाची आई शाहीन मुल्ला यांच्या कडून रोख बक्षीस देण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांच्या हस्ते साद याचे गुलाब पुष्प व बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले.  वर्गशिक्षिका मधुमती गावस यांनी कोणास रिंग सापडल्यास आणून दिली तर बक्षीस जाहीर केले होते. अभिनंदन प्रसंगी, मधुमती गावस, शाहीन मुल्ला, शाळेतील सर्व अध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. साद च्या प्रामाणिकपणाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव व सदस्यांनीही कौतुक केले. तो कोवाड येथील न्यूज साप्ताहिक न्यूज लाईफ चे संपादक, पत्रकार बाबासाहेब मुल्ला यांचा चिरंजीव आहे. 

No comments:

Post a Comment