चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षित जागेवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे जात पडताळणी प्रस्ताव चंदगड आता तहसील कार्यालयातच स्वीकारले जाणार आहेत , अशी माहिती जात पडताळणी उपायुक्त उमेश घुले व प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली . जात पडताळणी प्रस्ताव देण्यासाठी उमेदवारांना चंदगडहून कोल्हापूर येथे जावे लागत होते . त्यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात होता.तो वाचावा या हेतूने ही सोय करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment