चंदगड येथे शनिवारी ३ डिसेंबर रोजी होणार पत्रकारांची आरोग्य तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2022

चंदगड येथे शनिवारी ३ डिसेंबर रोजी होणार पत्रकारांची आरोग्य तपासणी

  


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

          पत्रकारांची मातृसंस्था 'मराठी पत्रकार परिषदे' च्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य विभाग चंदगड यांच्यावतीने तालुक्यातील सर्व पत्रकारांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 

         मराठी पत्रकार परिषद संलग्न 'चंदगड तालुका पत्रकार संघ' (रजिस्टर) यांच्या पुढाकाराने शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे तालुक्यातील प्रिंट (दैनिक साप्ताहिक) व डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी होणार आहे. न्यायमूर्ती अमृत बिराजदार (दिवाणी न्यायाधीश चंदगड) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास विनोद रणवरे (तहसीलदार चंदगड), संतोष घोळवे (पोलीस निरीक्षक चंदगड),  चंद्रकांत बोडरे (गटविकास अधिकारी चंदगड), अमर निकम (आगार व्यवस्थापक चंदगड) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कामी आरोग्य अधिकारी डॉक्टर सोमजाळ, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सचिन गायकवाड व ग्रामीण रुग्णालयाचा संपूर्ण स्टाफ यांचे सहकार्य लाभत आहे.  पत्रकार बंधूंनी वेळेत उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून उपचारांचा लाभ घ्यावा असे आवाहन चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष- नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष- श्रीकांत पाटील, सचिव- चेतन शेरेगार, खजिनदार- संपत पाटील, संस्थापक- अनिल धुपदाळे यांनी केले आहे.

             पत्रकार परिषद वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. यावर्षी एकाच दिवशी राज्यातील दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी घोषित केले आहे.

No comments:

Post a Comment