माडखोलकर यांनी बहुजन समाजाच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा आणली - डॉ.चंद्रकांत पोतदार - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2022

माडखोलकर यांनी बहुजन समाजाच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा आणली - डॉ.चंद्रकांत पोतदार



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

             'माडखोलकर सरांचा  शिक्षणा विषयक दृष्टिकोन व्यापक होता. शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पनांचा त्यांनी पुरस्कार केला. अध्ययन व अध्यापनाविषयी त्यांना आत्मीयता वाटत होती. माणूस घडविणारे शिक्षण त्यांना अभिप्रेत होते. चंदगड तालुक्यातील बहुजन समाजाच्या दारापर्यंत ज्ञानाची गंगा नेण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली.शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे हे लक्षात घेऊन सरांनी वैचारिक परिवर्तनाची नांदी केली.तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे अत्यंत कौतुकास्पद कार्य केले,अशा शब्दात डॉ .चंद्रकांत पोतदार यांनी खेडूत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन स्वर्गीय र. भा. माडखोलकर यांना आदरांजली वाहिली.

          ते माडखोलकर सरांच्या ९७ व्या जयंती कार्यक्रमांत बोलत होते.अध्यक्ष स्थाना वरून बोलताना प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी कै. र.भा .माडखोलकर सरांनी सुमारे पाच तपे शिक्षणाचा विचार केला. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य केले .तालुक्यातील ज्ञान प्रसाराच्या चळवळीचे ते अगदूत होते .तथाकथित शिक्षण सम्राट होण्याऐवजी त्यांनी शिक्षण महर्षी म्हणूनच कार्य केले .गुणग्राहकता व संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी अनेक सहकारी जोडले .त्यांच्या विचारांचे पाईक होण्याची आज गरज आहे. संस्थेच्या उभारणीतील हे पायरीचे दगड कृतज्ञतापूर्वक नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत.'असे प्रतिपादन केले.प्रारंभी सरांच्या स्मृतिस्थळी मान्यवरानी पुष्पहार वाहून श्रद्धांजली अर्पण केली .याप्रसंगी सरांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिलाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच ज्येष्ठ साहित्यिक कै.नागनाथ कोत्तापल्ले यांना आदरांजली वाहण्यात आली. माजी प्राचार्य डॉ. एस. पी .बांदिवडेकर यांनी सरांनी खऱ्या अर्थाने जीवनाचे सार्थक केले. त्यांच्या मौलिक योगदानामुळेच संस्थेचा उत्कर्ष झाला असे मत व्यक्त केले व गतस्मृतीना उजाळा दिला

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.ए.डी. कांबळे यांनी केले तर आभार डॉ.एन.एस मासाळ यांनी मानले. कार्यक्रमाला एल .डी .कांबळे देवानंद कदम, एम .एम . तुपारे,गोपाळ बोकडे, एन. के. देवळी, ए.जी. बोकडे , आर.पी .बांदिवडेकर यांच्यासह विद्यार्थी ,कर्मचारी ,शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होती.

No comments:

Post a Comment