यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक एड्स दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2022

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक एड्स दिन उत्साहातचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

               हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर  हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी संजय पाटील होते. 

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग प्रमुख प्रा. यु एस पाटील यांनी केले. यावेळी डॉ.गजेंद्र पाटील यांनी एड्स ची लक्षणे कशी असतात व त्या संदर्भात शासनाने वेगवेगळी मार्गदर्शन करण्याऱ्या संस्था उपलब्ध करून दिलेल्या आहेत याची माहिती दिली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग प्रमुख प्रा. यु एस पाटील यांनी केले पाहुण्यांचे स्वागत प्रा. जी जे गावडे यांनी केले. प्राचार्य डॉ. बि डी अजळकर प्रा. अंकुश नौ कुडकर, प्रा.नंदू पाटील व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रा. शाहू गावडे यांनी मांनले व सूत्रसंचालन प्रा जी जे गावडे यांनी केले.

No comments:

Post a Comment