शिनोळी येथील अंकिता पन्हाळकर हीची शिवाजी विद्यापीठ कबड्डी संघात निवड - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2022

शिनोळी येथील अंकिता पन्हाळकर हीची शिवाजी विद्यापीठ कबड्डी संघात निवड

 

अंकिता पन्हाळकर

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

             शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) गावची कन्या व मजरे कार्वे (चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंकिता वैजनाथ पन्हाळकर हिची अश्वमेध कबड्डी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. यामुळे तिचे परिसरातून कौतुक होत आहे. ती सध्या बी. कॉम. शाखेत तृतीय वर्षात शिक्षण घेत असून कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेत निवड झाली. सध्या ती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सराव करत होती. गुरुवार दि. १ रोजी ती औरंगाबाद येथे रवाना झाली. तिला  शारदा शिक्षण संस्थेचे सचिव जे बी पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. पाटील, प्रा. गजानन पाटील तसेच क्रीडा संचालक प्रा. अनिल कुट्रे यांचे मार्गदर्शन लाभले. अश्वमेध स्पर्धा ही ३ डिसेंबर पासून औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर होणार आहेत. तिच्या निवडीबद्दल चंदगड तालुक्यातून कौतुक होत आहे.No comments:

Post a Comment