माडखोलकर महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न, ४१ रक्तदात्यांनी केले रक्तदान - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2022

माडखोलकर महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न, ४१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ब्लड बँक बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. र. भा. माडखोलकर यांच्या 97 व्या जयंती दिनानिमित्त दि 1-12-22 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.  या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी व शिवाजी विद्यापीठाचे जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रमुख अतिथी डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी रक्तदाते स्वयंसेवक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.

         रक्तदान शिबिरामध्ये एकूण 41 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली समाजाप्रती बांधिलकी जपत रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे सार्थ करून दाखविले. रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील दोनशेवर विद्यार्थी व सेवकांची एच. बी. तपासणी केली. सुदृढ आरोग्यासंबंधी कांही सूचक माहिती देण्यात आली. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब(RRC) यांच्यावतीने जागतिक एड्स दिन संपन्न केला व यापुढे विविध उपक्रम व रॅलीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करुन "एड्समुक्त महाराष्ट्र, स्वप्न नव्हे ध्येय!" या ब्रीद खाली एड्स सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे. ग्रामीण रुग्णालय, चंदगड, पंचायत समिती आणि नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

            रक्तदान शिबिरासाठी खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. एस. पी. बांदिवडेकर, एम. एम. तुपारे, अँड आर. पी. बांदिवडेकर, गोपाळ बोकडे, माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे, डी. एस. कदम, प्रा एस. के. सावंत, शरद हदगल, डॉ एस. एस. सावंत, डॉ एम. एम. माने, ब्लड बँक बेळगावचे विनायक मेणसे, बसवराज बेन्नी व त्यांची सर्व टीम, नेहरू युवा केंद्राचे अमेय सबनीस, पंचायत समितीचे विठ्ठल पाटील, श्री कोळी, श्रीपाद सामंत महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

         NSS समिती सदस्य प्रा. संजय पाटील, प्रा.व्हि. के. गावडे, डॉ एस.डी. गावडे, डॉ एन. के. पाटील, प्रा आर. एस. पाटील, प्रा ए. डी. कांबळे, डॉ एन एस मासाळ, डॉ कमलाकर, पी. पी. धुरी, एस.बी. हासुरे, प्रल्हाद कांबळे, विक्रम कांबळे, सौ. प्रमिला पाटील, सर्व स्वयंसेवक यांनी रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. डॉ एन. के. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment