वन्य प्राण्यापासून होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करुन वाढीव भरपाई द्यावी – मनसेचे वनविभागाला निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2022

वन्य प्राण्यापासून होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करुन वाढीव भरपाई द्यावी – मनसेचे वनविभागाला निवेदन

पाटणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना मनसेचे पदाधिकारी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुका हा डोंगरी भाग असल्याने या ठिकाणी हत्ती, गवे, माकड, रान, डुकरे इत्यादी वन्य प्राण्यांचा उपद्रव्य मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात शेती असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वनविभागाने वन्य प्राण्यांना आवर घालावी. वन्य प्राण्यापासून होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करुन वाढीव भरपाई द्यावी. अशा आशयाचे निवेदन चंदगड महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने परिक्षेत्र वन अधिकारी पाटणे यांना दिले आहे. 

         वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीच्या बदल्यात मिळणारा मोबदला पुरेसा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. यांची आपण दखल घेऊन लवकरत लवकर पंचनामे करुन शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त नुकसानभरपाई मिळवुन द्यावे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान होऊ नये. म्हणुन या वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे याबाबत मागणी करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अशा आशयाचे निवेदन मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष राज सुभेदार व जिल्हा उपाध्यक्ष प्रताप उर्फ पिनू पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वनविभागाला दिले आहे. 

No comments:

Post a Comment