चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ब्लड बँक बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माडखोलकर महाविद्यालयात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या हस्ते झाले.
प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रकल्प अधिकारी व शिवाजी विद्यापीठाचे जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले महाविद्यालयातील सुमारे २०० हून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली. यावेळी रेड रिबन व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स दिनानिमित्त रॅली काढण्याचे व सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती नेहरू युवा केंद्राचे अमेय सबनीस यांनी दिली. या रक्तदान शिबिरास माजी प्राचार्य डॉ. एस. पी. बांदिवडेकर, एम. एम. तुपारे, आर. पी. बांदिवडेकर, डी. एस. कदम, एस. के. सावंत, शरद हदगल, एस. एस. सावंत, डॉ. एम. एम. माने पंचायत समितीचे विठ्ठल, श्री. कोळी, श्रीपाद सामंत यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment