चंदगड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीसाठी १०९९ अर्ज दाखल, सरपंच व सदस्य पदासाठी किती इच्छुकांनी भरला अर्ज, वाचा सी. एल. न्यूजवर - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2022

चंदगड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीसाठी १०९९ अर्ज दाखल, सरपंच व सदस्य पदासाठी किती इच्छुकांनी भरला अर्ज, वाचा सी. एल. न्यूजवर

तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी केलेली एकच गर्दी.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील निवडणुक लागलेल्या ४० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी एकच भाऊ गर्दी केली होती. सरपंच पदासाठी १७० व सदस्यपदासाठी ९२९ असे एकूण    १०९९ अर्ज दाखल झाले आहेत. ऑफ लाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे  चंदगड तहसील कार्यालयात निवडणूक विभागाचे रात्री उशीरापर्यंत कामकाज सूरू होते.

     चंदगड तालुक्यातील निवडणुक लागलेल्या ग्रामपंचायतीची नावे तसेच सरपंच व सदस्य पदासाठी दाखल झालेले अर्ज संख्या पुढील प्रमाणे - 
अडकूर(६)५० अलबादेवी(३)१४, आसगोळी,(७)८ कडलगे बु(७)२८ करंजगाव(३)८, कागणी,(०)२१ काजिर्णे/ म्हाळुंगे(४)२३, कूदनूर(१५)७७, केंचेवाडी(३)१९, कोकरे / आडुरे,(६)२१ कोनेवाडी,(६)२५ कोरज (४)२७कोलिक,(२)१७ कोंळिद्रे खालसा,(१)२२ गवसे(४)३७, गुडवळे खालसा(१)९, जंगमहट्टी,(३)२१ जेलुगडे,(२)८ डुक्करवाडी,(२)२२ढेकोळी(३)१९,तडशिनहाळ(७)२८, तेऊरवाडी(९)३०, दुंडगे(५)१८, नागणवाडी(२)१७, नागरदळे(४)३०, निटूर,(३)२१पार्ले(६)२४, महिपाळगड(१)१५, मोटणवाडी,(५)१२ म्हाळुगे खालसा(२)१८, राजगोळी खुर्द,(५)३३ लक्कीकटे,(१)८ विंझणे,(६)२२ शिनोळी बु,(५)३०  शिरगांव(४)४२, सरोळी(३)११, सातवणे,(२)१० हल्लारवाडी,(४)१८ हिडगांव,(७)२७ हेरे(५)२९.

आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसह गावपातळीवर पुढाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. ऑनलाईन सर्व्हर डाउन झाल्याने गुरुवारी निवडणुक आयोगाने उमेदवारांना ऑफलाईन अर्ज भरण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे अर्ज भरण्यास ऑनलाईन सेवा केंद्राऐवजी तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. तालुक्यात निवडणुक लागलेल्या एकुण ४० ग्रामपंचायतीपैकी सरपंच पदासाठी कोळींद्रे खालसा,गुडवळे खालसा,महिपाळगड, लक्कीकटे येथे एकच अर्ज दाखल झाल्याने येथील सरपंच पदाची निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. बिनविरोध निवडून आल्याची फक्त औपचारिकता शिल्लक आहे. तर कागणी येथे आरक्षित झालेल्या जागेवर उमेदवार न मिळाल्याने सरपंच पद रिक्त राहण्याची शक्यता आहे. आसगोळी, करंजगाव, गुडवळे खालसा, जेलुगडे, लक्कीकट्टे, मोटणवाडी, सातवणे, सरोळी येथील ग्रामपंचायतींची निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटाच्या राजकरणाची आजही चलती आहे. त्यामुळे भावकी-भावकीतील उमेदवारी या निमित्ताने डोकी वर काढत असतो. तालुक्यातील ४०पैकी किती सरपंच व सदस्य बिनविरोध होणार हे चित्र अर्ज माघारी नंतरच स्पष्ट होणार आहे.
       शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयाच्या आवाराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. उमेदवारी अर्ज ऑनलाइन वरून ऑफलाइन प्रक्रियेवर आल्यामुळे डमी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली. त्यातच शेवटच्या दिवशी अर्ज स्वीकारण्यासाठी अडीच तासाचा वेळ वाढल्याने ऐनवेळी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज भरले गेले. 






No comments:

Post a Comment