कोवाड महाविद्यालयात एड्स दिनी मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2022

कोवाड महाविद्यालयात एड्स दिनी मार्गदर्शनचंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       कोवाड (ता. चंदगड) येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. एस. पवार होत्या. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. के. एस. काळे यांनी एड्स सारखा महाभयानक असा विषाणू असून त्यामुळे अनेक लोक बळी जात आहेत. आजही त्याचे गांभीर्य तितकेचे आहे. आजही तो समूळ नष्ठ झालेला नाही. आजच्या तरुणाईने या एच. आय. व्ही. पासून कोसो लांब राहणे काळची गरज असल्याचे प्रतिपादन केले. आजही आपण त्याबाबत जागरूक नाही, ही बाब चिंतनीय आहे. हा आजार हा तरुणाईमध्ये  जास्त असुन आजच्या तरुणाईने सतर्क असावे, असाध्य रोगाबद्दल दक्षता घेणे गरजेचे असल्याचे डॉ. काळे सांगितले. 

        अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एम. एस. पवार म्हणाल्या. 'आजची तरुणाई सोशल मिडीयाच्या विळख्यात अडकून वेगवेगळ्या नशेच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवून टाकत आहेत. त्यासाठी तरुणाईने सावधगिरीने जीवन प्रवास करावा' म्हणून आवाहन केले.

       यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ. बी. एस. पाटील प्रा. डॉ. ए. के. कांबळे डॉ. आर. डी. कांबळे, प्रा. एस. जे. पाटील, डॉ. दीपक पाटील, डॉ. के. पी. वाघमारे प्रा. शीतल मंडले आदी सर्व विभागांचे प्रमुख प्राद्यापक, विद्यार्थी यांची  उपस्थिती होती. स्वागत डॉ. दीपक पाटील यांनी केले.

        प्रास्ताविक डॉ. व्ही. के. दळवी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे यांनी केले. आभार प्रा. शीतल मन्डले यांनी मानले. प्रारंभी  शिवप्रतिमेचे पूजन प्रा. डॉ. ए. के. कांबळे  यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाबद्दल आदरांजली वाहण्यात आली.

             या कार्यक्रमाचे आयोजन एन. एस. एस. विभाग, समाजशाश्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांच्या मार्गदर्शनखाली करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment