चंदगड तालुका समाज सुधारणा सेवाभावी मंडळाच्या वतीने १ जानेवारीला कार्यक्रमाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2022

चंदगड तालुका समाज सुधारणा सेवाभावी मंडळाच्या वतीने १ जानेवारीला कार्यक्रमाचे आयोजन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुका समाज सुधारणा सेवाभावी मंडळाच्या फलकाचे उद्घाटन व गुणवंताचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम १ जानेवारी २०२३ रोजी कोर्ट रोड, महसुल भवन शेजारी सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे स्विय सहय्यक अभयकुमार वन्टे, उद्योजक किरण सुतार, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, कोल्हापूर उद्योजक संघाचे अध्यक्ष सुनिल काणेकर, चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. चंदगड तालुका समाज सुधारणा सेवभावी मंडळाचे अध्यक्ष भिमसेन राजहंस अध्यक्षस्थानी असतील. 

        यासह तहसिलदार विनोद रणवरे, पो. नि. संतोष घोळवे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे, चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, ड.  अर्जुनराव राजहंस, ड. निवृत्ती आजरेकर, नगरसेवक अनंत हळदणकर यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक उपस्थित रहाणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने केले आहे. 

No comments:

Post a Comment