बेळगाव येथील सह्याद्री मल्टी- पर्पज को. ऑप. सोसायटी लि. यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमध्ये मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील श्री हनुमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. भाषण स्पर्धेत माध्यमिक विभागात हर्षदा संदीप पाटील (इ. ९वी) हिने प्रथम क्रमांक मिळवला. तर गायन स्पर्धेत मधुरिका रमेश नौकुडकर (इ. १०वी) उत्तेजनार्थ, समूह गायन स्पर्धेत माध्यमिक विभागात उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
यशस्वी विद्यार्थ्यांना एम. एम. कांबळे, बी. ए. पाटील, जी. डी. नांदवडेकर, एल. आर. तुपारे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक पी. टी. वडर यांनी अभिनंदन केले.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
No comments:
Post a Comment