चंदगड तालुक्यातील गिरणी कामगार व वारसदारांनी अडकुर येथे कागदपत्रे जमा करावीत, श्रमिक संघटनेचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2022

चंदगड तालुक्यातील गिरणी कामगार व वारसदारांनी अडकुर येथे कागदपत्रे जमा करावीत, श्रमिक संघटनेचे आवाहन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           चंदगड कामगारांनी गिरणी घरासाठी तालुक्यातील मुंबईतील आपले अर्ज अडकूर येथे तात्काळ जमा करावेत, असे आवाहन सर्व श्रमिक संघटनेमार्फत करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने गिरणी घरे कामगार मिळावीत, यांना मुंबईत यासाठी सर्व श्रमिक संघटनेचा लढा सुरू आहे . या दृष्टीने म्हाडाकडे छाननीही सुरू आहे. म्हाडाने काही सूचना जाहीर केल्या असून त्यांचे अर्ज अडकूर येथील रवळनाथ मंदिर येथे भरून घेणार आहेत. तरी सर्व गिरणी कामगार व वारसदारांनी याची नोंद घ्यावी.

           दि. ५ जानेवारीपर्यंत सर्व अर्ज भरण्यात येणार असून परत ही संधी दिली जाणार नाही. त्याचे निकष गिरणी कामगार व वारसदार यांचे डबल अर्ज असलेले, नावात बदल असलेले, सांकेत क्रमांक चुकीचा किंवा बदल असलेले मिलच्या कागदपत्रात बदल झाले असलेले, म्हाडाची पावतीअसून यादीत नाव नसलेले, गिरणी कामगारांच्या इतर काही अडचणी असलेले, संघटनेची लढा निधीची पावती सोबत आणणे या त्रुटी असलेल्या गिरणी कामगारांनी मुंबई म्हाडा कार्यालय येथे जाण्याऐवजी अडकूर येथील रवळनाथ मंदिर येथे भरून घेणार आहेत सोबत म्हाडाची पावती, एक फोटो व कागदपत्रे आणावेत, असे आवाहन सर्व श्रमिक संघटनेचे गोपाळ गावडे, हणमंत खामकर  यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment