हलकर्णी महाविद्यालयात जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2022

हलकर्णी महाविद्यालयात जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन

हलकर्णी (ता. चंदगड) येथील गुरुवर्य गुरुनाथ विठठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात समान संधी केंद्र व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, कोल्हापूर यांच्या वतीने जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत मार्गदर्शन करताना सामाजिक न्याय विभागाचे  किरण चौगुले, बसलेले प्राचार्य अजळकर, उपाध्यक्ष संजय पाटील आदी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हलकर्णी (ता. चंदगड) येथील गुरुवर्य गुरुनाथ विठठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात समान संधी केंद्र व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, कोल्हापूर यांच्या वतीने जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबीर दौलत विश्वस संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. यावेळी सामाजिक न्याय विभाग कोल्हापूरचे प्रतिनिधी किरण चौगुले यांनी विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या सवलती व विविध शिष्यवृत्यांची माहिती दिली. 

        जात प्रमाणपत्र पडताळणीचे महत्व मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रम, नोकरी इ. साठी जात पडताळणी किती आवश्यक आहे, हे सांगितले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारी पूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्राची ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज भरताना जी काही मदत व सहकार्य लागेल यासाठी सामाजिक न्याय विभाग तुमच्या मदतीसाठी उपलब्ध असेल असे सांगितले,तर प्राचार्य बी. डी. अजळकर यांनी सामाजिक न्याय विभाग व महाविद्यालय यांच्या सहकार्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत असे आवाहन केले. प्रारंभी प्रास्ताविक प्रा. एन. के. जावीर यांनी केले. कार्यक्रमाला प्रशांत शेंडे, श्रीपत कांबळे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रा. सी. एम. तेली यांनी मानले.

No comments:

Post a Comment