कागणी गावावर शोककळा, दादा देसाई यांना मातृशोक, बारा तासांच्या कालावधीत शेतकरी रणजीत देसाई, संजय भोगण यांचेही निधन - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2022

कागणी गावावर शोककळा, दादा देसाई यांना मातृशोक, बारा तासांच्या कालावधीत शेतकरी रणजीत देसाई, संजय भोगण यांचेही निधन

लक्ष्मी रमेश देसाई

कागणी - सी. एल. वृत्तसेवा / एस. एल. तारीहळकर

       कागणी (ता. चंदगड) येथे बारा तासांच्या कालावधीमध्ये तिघा प्रतिष्ठित नागरिकांचे निधन झाल्यामुळे कागणी गावावर शोककळा पसरली आहे. सोमवारी  दिनांक २६  रोजी रात्री ११.३० वाजता लक्ष्मी रमेश देसाई (वय ६५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. तर मंगळवारी  दिनांक 27 रोजी सकाळी आठच्या दरम्यान शेतकरी रणजीत देसाई (वय 50) यांचे निधन झाले.  त्यानंतर केवळ तासाभराच्या अंतराने शेतकरी संजय उर्फ कल्लाप्पा अमृत भोगण (वय 45) यांचेही निधन झाले. या तिन्ही घटनामुळे  कागणी गावावर अशोक कळा पसरली आहे. या तिघावरही मंगळवारी सकाळच्या सत्रात अंत्यसंस्कार करण्यात आले. 


कागणी  येथे दादा देसाई व पिंटू देसाई यांना मातृशोक

         कागणी (ता.चंदगड) येथील लक्ष्मी रमेश देसाई (वय 65) यांचे हृदयविकाराने सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कागणी येथील हॉटेल व्यवसायिक व सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त कर्मचारी रमेश देसाई  यांच्या त्या पत्नी होत . ट्रॅव्हल्स व्यावसायिक दादा (सटवाप्पा) देसाई व  स्टील फर्निचर व्यावसायिक पिंटू (जोतिबा) देसाई यांच्या त्या मातोश्री होत. मंगळवारी सकाळी झालेल्या अंत्यसंस्काराप्रसंगी भारतीय सैन्य दलाचे जेसीओ राजू देसाई, जेसीओ सदानंद भोगण,  विनायक भोगण (कोल्हापूर), संदीप भोगण (उत्तुर) यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी होणार आहे. 

कागणी येथील रणजीत देसाई यांचे निधन 

             कागणी (ता. चंदगड) येथील  राजगोळकर  गल्लीतील रणजीत वसंत देसाई (वय 50) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, भाऊ, बहीण, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. ट्रॅव्हल्स व्यावसायिक सूरज देसाई  यांचे ते वडील व कोवाड (ता. चंदगड) येथील कला महाविद्यालयाचे कर्मचारी अजित वसंत देसाई यांचे ते भाऊ होत. रक्षाविसर्जन गुरुवारी होणार आहे.

संजय उर्फ कल्लाप्पा अमृत भोगण

कागणी येथील संजय उर्फ कलाप्पा  भोगण यांचे निधन

         कागणी (ता. चंदगड) शिवाजी चौक येथील संजय उर्फ कल्लाप्पा अमृत भोगण ( वय ४५) अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी आहे. ते २० वर्षापासून कागणी येथे आहेत. त्यापूर्वी बेळगाव येथेच राहावयास होते.

No comments:

Post a Comment