तिलारी घाटात टमाटा वाहतूक करणाऱ्या वाहनाला भीषण अपघात लाखोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2022

तिलारी घाटात टमाटा वाहतूक करणाऱ्या वाहनाला भीषण अपघात लाखोंचे नुकसान

अपघातग्रस्त वाहन

दोडामार्ग २८ / सी. एल. वृत्तसेवा

        गोवा दोडामार्ग ते कोल्हापूर बेळगाव विजघर मार्गावर असलेल्या तिलारी घाटात बुधवारी पहाटे  टमाटा घेऊन दोडामार्ग मार्गे पणजी येथे जाणाऱ्या भाजी वाहतूक टेम्पोला भिषण अपघात झाला या अपघातात लाखो रुपये नुकसान झाले आहे.सुदैवाने आतील सर्व सुखरूप बचावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तिलारी घाटात अपघाताची मालिका सुरू आहे.

          सांगली जत येथून जवळपास तीन टन टमाटा  घेऊन तिलारी घाट मार्गे दोडामार्ग मार्गे  पणजी येथे जाणारा मालवाहतूक करणारा टेम्पो एम एच १० डी.टी.१२८३ यांचे घाटाच्या पायथ्या पासून दिड किलोमीटर अंतरावर घाट उतरून खाली येत असताना अचानक ब्रेक फेल झाले त्यामुळे तीव्र उतारावर टेम्पो रस्त्याच्या संरक्षण कठडा याला  धडक देऊन खाली कोसळला त्यामुळे टेम्पोचे  पुढील दोन्ही चाके तुटून बाहेर फेकली गेली.

No comments:

Post a Comment