तेरवण मेढे उन्नैयी बंधारा उजव्या कालव्याला भटवाडी येथे भगदाड - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2022

तेरवण मेढे उन्नैयी बंधारा उजव्या कालव्याला भटवाडी येथे भगदाड

दोडामार्ग दि. २८ / सी. एल. वृत्तसेवा

          तिलारी जलसंपदा विभाग यांच्या कालव्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी असताना संबंधित अधिकारी बोगस कामे करणाऱ्या मंडळींना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी कालवे फुटत असताना बुधवारी तेरवण मेढे बंधाऱ्याच्या उजव्या कालव्याला भटवाडी येथे भगदाड पडले. त्यामुळे लाखो लिटर पाणी नदी पात्रात भगडाड पडले असताना संबंधित अधिकारी यांची पाठ फिरवली. शिवसेना पदाधिकारी संतोष मोर्ये, राजन मोर्ये यांनी तसेच शेतकरी बांधव यांनी तेरवण मेढे बंधारा येथे संपर्क साधला. या नंतर दोन तासांनी गेट बंद करण्यात आली.

No comments:

Post a Comment