कर्यात परिसरात भुरट्या चोऱ्या..! हंडे, बंब, घागरी लंपास - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2022

कर्यात परिसरात भुरट्या चोऱ्या..! हंडे, बंब, घागरी लंपास

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

        कालकुंद्री (ता. चंदगड) परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. गेल्या दोन-तीन दिवसात कालकुंद्री येथील भालचंद्र हरिभाऊ पाटील यांच्या घरामागील चुलीवर ठेवलेला तांब्याचा मोठा हंडा, संजय पुंडलिक पाटील यांचा पाणी तापवण्याचा तांब्याचा बंब तर काही घरामागे वावरासाठी ठेवलेल्या तांबा, पितळेच्या घागरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्या आहेत. 

         वर्षातील ठराविक आठ पंधरा दिवसात कालकुंद्री, कुदनूर व परिसरातील अन्य गावातून अशा घरामागे ठेवलेल्या वापरातील तांबा, पितळेच्या घागरी, हंडे, बंब अशा वस्तू लंपास केल्या जातात असा अनुभव आहे. त्यामुळे हे लोक कोण असावेत? याचा तर्कवितर्क ग्रामस्थ करत आहेत. कालकुंद्रीतील चोऱ्यांचे हे प्रकार पाहता अशा घटना येत्या आठ पंधरा दिवसात पंचक्रोशीतील अन्य गावात घडू शकतात. ग्रामस्थांनी दक्षता पाळून आपल्या उघड्यावर ठेवलेल्या वरील प्रकारच्या वस्तू सुरक्षित ठेवाव्यात तसेच अशा चोरट्यांच्या मागावर राहून त्यांना पकडून अद्दल घडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment