वाघोत्रे ग्रामस्थ मंडळाचा मुंबईत पार पडला कौटुंबिक मेळावा, आम.राजेश पाटील यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2022

वाघोत्रे ग्रामस्थ मंडळाचा मुंबईत पार पडला कौटुंबिक मेळावा, आम.राजेश पाटील यांची उपस्थिती


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          नोकरी, व्यवसायांमध्ये बरीच वर्ष बस्तान बसवून एकोप्याने राहणार्‍या वाघोत्रे (ता. चंदगड) येथील मुंबईस्थित ग्रामस्थांनी सर्वांना एकत्र करत प्रथमच कुटुंब मेळावा घेतला. या मेळाव्याला चंदगड विधानसभेचे आम. राजेश पाटील, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश चव्हाण,माजी सरपंच मारूती गावडे यांची प्रमुख उपस्थिती होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला  दिवंगत जेष्ठ नागरिक कै. बाबली धोंडिबा कातकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक बाळकृष्ण गावडे यानी करून कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. आम. राजेश पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश चव्हाण यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले.

          यावेळी आम. राजेश पाटील यानी गावापासून नोकरी,व्यवसायानिमित्त सहाशेहे किलोमीटर अंतरावर येत एका कुंटूबाप्रमाणे राहून सर्वांच्या अडी-अडचणी सोडवता येतात. हे वाघोत्रे ग्रामस्थानी या कुटूंब मेळाव्यातून दाखवून दिले.या कौटुंबिक मेळाव्यातून एकीची भावना वाढीस लागते.

        वाघोत्रे ग्रामस्थांनी भरवलेला हा कुटूंब मेळावा मला भावला असून चंदगड तालुक्यातुन देण्यात येणारा एकीचा कौटुंबिक पुरस्कार हा मुंबईस्थित वाघोत्रे ग्रामस्थांना देणार असल्याचे आम. पाटील यानी सांगितले. तर पो. नि. राजेश चव्हाण यांनी खेडेगावातून येऊन मुंबई सारख्या शहरात येऊन आपली वेगळी ओळख निर्माण करत वाघोत्रे ग्रामस्थांनी घेतलेला कौटुंबिक स्नेह मेळावा गावाकडून मुंबई येणाऱ्यांना आधार असल्याचे सांगीतले. तर असे उपक्रम दरवर्षी  व्हावेत अशी सर्व ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केली. 

          असा हा मेळावा घेऊन समाजात एक नवीन आदर्श ठेवण्याचे काम वाघोत्रे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी केले आहे. हा मेळावा यशस्वी संपन्न होण्यासाठी बाळकृष्णा गावडे, प्रविण शिवराम गावडे, पांडुरंग गोविंद गावडे, सोनू सावंत, सागर गावडे, नरेश गावडे, एकनाथ गावडे,पांडुरंग तुकाराम गावडे, दिपक महादेव कातकर, सौ. राधा गावडे, सौ.भाग्यश्री गावडे, सौ. सुनिता कातकर, सौ. पुष्पा कातकर, सौ. कावेरी गावडे, सौ. अश्विनी अशोक गावडे आदींनी हा मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.आभार नरेश गावडे यानी मानले. 



No comments:

Post a Comment