कालकुंद्रीच्या प्रथम पाटील याची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2022

कालकुंद्रीच्या प्रथम पाटील याची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

सातारा येथील कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेतील उपविजेते पदाचे प्रमाणपत्र व पदक मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना  प्रथम पाटील.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम पवार ज्युनियर कॉलेजमध्ये ११ वीत शिकणारा विद्यार्थी प्रथम पांडुरंग पाटील याची ४०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेत प्रथम ने ४०० मीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला होता. गतवर्षी पंजाब येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत २००० मीटर धावणे प्रकारात त्याने महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. 

         त्याला क्रीडा शिक्षक प्रा. डी एम तेऊरवाडकर, अनिल हिशेबकर, इ एल पाटील व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक एस एल बेळगावकर व ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामस्थ व त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. प्रथमच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment