नारायण पाटील |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील यादव गल्लीतील माजी सैनिक, हवालदार नारायण कुमाणा पाटील (वय ५५) यांचे आज ३१ डिसेंबर २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कालकुंद्री येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर उद्या दि. १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुन, भाऊ असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment