उद्योजक रतन टाटा यांना वाढदिवसानिमित्त रांगोळीतून शुभेच्छा, कोणी दिल्या....... - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2022

उद्योजक रतन टाटा यांना वाढदिवसानिमित्त रांगोळीतून शुभेच्छा, कोणी दिल्या.......

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           लाखो कुटुंबाचे पोशिंदा, उद्योगपती पद्मभूषण रतन टाटा यांच्या ८५ वा वाढदिवसानिमित्त बेळगावचे रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी रांगोळी रेखाटून शुभेच्छा दिल्या. कृष्णधवल रंगातील दीड बाय दोन फूट आकारातील रांगोळी  रेखाटण्यासाठी पाच तास वेळ  लागला. 

        ज्योती फोटो स्टुडिओ येळ्ळूर रोड, नाझर कॅम्प, माधवपूर- वडगाव, बेळगाव येथे २८ डिसेंबर या टाटा यांच्या वाढदिवसा पासून ही कलाकृती पाहण्यासाठी खुली आहे. याला कला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून ही रांगोळी २ जानेवारी अखेर सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत पाहण्यासाठी खुली असेल. याचा लाभ घेण्याचे आवाहन औरवाडकर कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे. या उत्कृष्ट कलाकृती बद्दल अजित औरवाडकर यांचे शहर व परिसरातून मोठे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment