बाळासाहेबांची शिवसेनेच्या चंदगड तालुक्यातील नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2022

बाळासाहेबांची शिवसेनेच्या चंदगड तालुक्यातील नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र

 


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील करंजगाव, सदावरवाडी, कोलीक, तुडये, सरोळी, हाजगोळी या गावात बाळासाहेबांची शिवसेनेच्या (मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे गटाच्या) नवीन शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख यांच्या निवडी जाहीर करून तालुका प्रमुख कल्लापान्ना निवगिरे व उपजिल्हा प्रमुख दिवाकर पाटील, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. 
तडशिनहाळ येथील संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी सरोळी गावातील २५ कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी तालुका प्रमुख कल्लापा निवगिरे, उपजिल्हा प्रमुख दिवाकर पाटील, तुलशिदास जोशी, यल्लाप्पा  पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला उपतालुका प्रमुख दत्ता पाटील,ओ बी सी सेलचे तालुका प्रमुख मारूती पाथरूट, बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष प्रकाश बागडी, मिथुन पाटील, नागेश नौकुडकर, तुकाराम पाटील, संभाजी पाटील शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते आभार तुलशिदास जोशी यांनी मानले.

No comments:

Post a Comment