राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार रविवारी गडहिंग्लज व चंदगड मध्ये!मतदारसंघात 350 कोटी रुपयांचा विकास निधी दिल्याबद्दल होणार नागरी सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार रविवारी गडहिंग्लज व चंदगड मध्ये!मतदारसंघात 350 कोटी रुपयांचा विकास निधी दिल्याबद्दल होणार नागरी सत्कार

 

अजित पवार

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्र राज्य सरकारचे विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार हे रविवार दि. ८ रोजी गडहिंग्लज व चंदगड दौऱ्यावर असून आमदार राजेश पाटील यांच्या पुढाकाराने त्यांचा भव्य नागरी सत्कार, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा सत्कार तसेच शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याबाबत ची माहिती चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भिकू गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

     पाटणे फाटा हलकर्णी एमआयडीसी (ता. चंदगड) येथे सकाळी १० वा.  त्यांचा कार्यक्रम सुरू होईल तर सायंकाळी ४ वा.   चन्नकुपी  (ता. गडहिंग्लज) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गत अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तीनशे ते साडेतीनशे कोटी हुन  अधिक रकमेची विकास कामे मिळाली आहेत. यासाठी माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व तसेच अन्य मंत्र्यांच्या सहकार्यातून हा निधी मिळाला आहे. तसेच कोरोना महामारी आली तरी दोन लाखापर्यंत कर्ज माफ तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान मार्चच्या पहिल्या बजेटमध्ये अजितदादा पवार यांनी तरतूद केली व ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले, याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंदगड तालुका अध्यक्ष भिकू तुकाराम गावडे यांनी ही माहिती दिली.




No comments:

Post a Comment