तुर्केवाडी येथील महादेवराव बी. एड. कॉलेजमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2023

तुर्केवाडी येथील महादेवराव बी. एड. कॉलेजमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्नचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव बी.एड. कॉलेजमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले. आजचा दिवस बालिका दिन तसेच स्त्री मुक्ती दिन म्हणून संपन्न केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य एन. जे. कांबळे हे होते. तर मार्गदर्शक प्रा. ग. गो. प्रधान, संस्थाध्यक्ष महादेवराव वांद्रे हे होते. 

      'सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वामुळे आजच्या सर्व स्त्रीया बदलत्या काळाची आव्हाने पेलण्यास सक्षम बनल्या.  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले केवळ आद्यशिक्षिका नसून त्या एक सर्वोत्तम सामाजिक अभियांता होत्या' असे प्रतिपादन प्रा. प्रधान यांनी केले.

         'आज सर्वच क्षेत्रात उत्तम यशसंपादन व कामगिरी करणाऱ्या स्त्रीया म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे फलित असून एक मुख्याध्यापिका, समाजसेविका,शिक्षणतज्ज्ञ व कवयत्री म्हणून सावित्रीबाई फुले यांचे कार्य महनीय आहे' असे प्रतिपादन अध्यक्ष प्र. प्राचार्य एन.जे.कांबळे यांनी केले. यावेळी बी.एड. प्रशिक्षणार्थी मोहन पाटील, मनोज जांबोटकर, तुकाराम नाईक, पूजा जाधव, आश्लेषा भंडारी,मीरा चौगुले,पुजा सुतार, अजित कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा स्पर्धा, कविता गायन, ओवी गायन, भित्तीपत्रिका यांमध्ये प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला.

      सदर कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष मा. महादेवराव वांद्रे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य एस. पी. गावडे, फार्मसी प्राचार्य अमर पाटील, श्रीम. देशपांडे एस.आर, व्ही. पी गुरव,प्रा.प्रियांका कदम, प्रा. पृथ्वी कांबळे, प्रा. निशिगंधा पाटील, प्रा. भक्ती बसापुरे,प्रा.सचिन कांबळेसह सर्व बी.एड्.प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. स्नेहल भोसले यांनी प्रास्ताविक केले.आभार युवराज वाघमोडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता चौगुले यांनी केले.

No comments:

Post a Comment