तुकाराम दत्ताजी पवार दूरदृष्टीचा शिक्षण महर्षि - प्रा. शहापूरकर, कालकुंद्री येथे लोकनेते तुकाराम पवार यांची जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2023

तुकाराम दत्ताजी पवार दूरदृष्टीचा शिक्षण महर्षि - प्रा. शहापूरकर, कालकुंद्री येथे लोकनेते तुकाराम पवार यांची जयंती साजरी

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    लोक कल्याणासाठी त्यांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी कुदनूरमध्ये सार्वजनिक पाणवठे, विहीरी व तलाव तसेच बहूजन समाजातील गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत. ती शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी कालकुंद्री येथे तालुक्यातील पहिली माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी स्वर्गीय लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार यांनी केलेले कार्य त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतो. असे प्रतिपादन प्रा. सुखदेव शहापूरकर यांनी केले. ते कालकुंद्री (ता. चंदगड) येथे लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. 

         अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्रीचे अध्यक्ष ॲड. एस आर पाटील होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. एल. बेळगावकर यांनी केले. जयंतीनिमित्त विद्यालयात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या रांगोळी स्पर्धांचे वसंत पवार यांच्या हस्ते झाले. प्रत्येक गटातू तीन विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. विद्यालयाला ४o हजार किंमतीचे व्हाईट बोर्ड देण्यासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी दीपक कालकुंद्रीकर व सीसीटीव्ही यंत्रणेसाठी श्रावण वर्पे दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचा खेळाडू प्रथम पांडुरंग पाटील याची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात ॲड. एस. आर. पाटील यांनी लोकनेते तुकाराम पवार यांचा कार्याचा आढावा घेतला.

         या प्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. आर. पी. पाटील,  प्रा. एन. एस. पाटील, जी. एस. पाटील, मनोहर पवार, वसंत पवार, राहुल पवार, तसेच एम. जे. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी  एम. एम. तुपारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रताप पाटील, शिवाजी कोकितकर, सर्व सदस्य, पवार कुटुंबीय, खेडूत संस्थेतील आजी-माजी शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन नीता कुंभार यांनी केले. बी. ए. तुपारे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment